क्रेडाई सातारामध्ये देशाचे नेतृत्व करण्याचे गुण ः शांतिलाल कटारिया

Kreḍai satara madhye desace netr̥tva karaṇyace guna ḥ śantilala kaṭariya

क्रेडाई अर्थातच कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या सातारा शाखेने अल्पावधीतच आपल्या कार्यामुळे देशभर ठसा उमटवला आहे. क्रेडाई सातारा शाखेची ही घोडदौड बघता देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी सातारा शाखेला मिळेल यात शंका नाही असे उद्गार क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी काढले.