बांधकाम संघटनांचे पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी मोलाचे प्रयत्न ः पंकज देशमुख

Bandhakama sanghaṭanance polisancya hakkacya gharasathi molace prayatna h pankaja desamukha

आयुष्यभर नोकरी करून निवृत्तीची वेळ जेव्हा पोलीस कर्मचार्‍यांवर येती त्यावेळी त्यांच्याकडे जिथे आयुष्यभर नोकरी केली त्याठिाकाणी स्वतःचं घर नसते अशी परिस्थिती मी पाहिली आहे. त्यावेळी गावाकडच्या घराकडे परत जाण्याचा त्यांचा विचार असतो. ही परिस्थिती बदलण्याची गरज असनू सातारा सारख्या छोट्या शहरात हक्काचं घर घेण्यासाठी क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेने आयोजित केलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचे गृहप्रकल्प प्रदर्शन खरोखच स्त्युत्य असल्याचे उद्गार जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी काढले.